कामचुकार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:28+5:302021-07-27T04:22:28+5:30
अहमदनगर : शहरात नियमित स्वच्छता झाली पाहिजे. स्वच्छतेत हलगर्जीपणा केल्यास संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा ...

कामचुकार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार
अहमदनगर : शहरात नियमित स्वच्छता झाली पाहिजे. स्वच्छतेत हलगर्जीपणा केल्यास संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिला आहे.
महापौर रोहिणी शेंडगे यांनी सोमवारी स्वच्छता विभागाची बैठक घेतली. बैठकीला घनकचरा विभागाचे आढावा नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, श्याम नळकांडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, घनकचरा व्यवस्थापनप्रमुख डॉ. शेडाळे, स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख, परीक्षित बीडकर, टी.एन. भांगरे, किशोर कानडे, सहायक स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. शेंडगे म्हणाल्या, शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविल्याने कोरोनाकाळात शहर स्वच्छ झाले. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली. शहरातील कचऱ्याचे ढीग नियमित उचलले गेले पाहिजेत. जुने बंद पडलेले ट्रॅक्टर चालू करावेत. केडगाव येथील भूषणनगर ते बाह्यवळणापर्यंतचा कचरा उचलण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. उपायुक्त यशवंत डांगे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांना सूचना केल्या. प्रत्येकाने जबाबदारीने काम केले पाहिजे. कचरा संकलनाचे काम घेतलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कामाचे नियोजन करावे, असे डांगे यांनी सांगितले.
...
सूचना: फोटो २६ शेंडगे नावाने आहे.