कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:57+5:302021-09-11T04:21:57+5:30

टोळीप्रमुख संदीप ईश्वर भोसले, मिलन ऊर्फ मिलिंद ईश्वर भोसले, मटक्या ऊर्फ नारायण ईश्वर भोसले, जमाल ऊर्फ पल्या ईश्वर भोसले ...

Action under 'Mocca' against notorious gang of robbers | कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

टोळीप्रमुख संदीप ईश्वर भोसले, मिलन ऊर्फ मिलिंद ईश्वर भोसले, मटक्या ऊर्फ नारायण ईश्वर भोसले, जमाल ऊर्फ पल्या ईश्वर भोसले व अटल्या ऊर्फ अतुल ऊर्फ योगेश ईश्वर भाेसले (सर्व रा. बेलगाव, ता. कर्जत) यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी, दहशत निर्माण करणे, खून करून दरोडा टाकणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.

--------------

संघटित गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

संघटितपणे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोक्का, हद्दपारी अशा कारवाई सर्वाधिक झाल्या. आणीख काही टोळ्यांच्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली असून या गुन्हेगारांवर येणाऱ्या काळात कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Action under 'Mocca' against notorious gang of robbers