अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 13:16 IST2021-02-19T13:16:30+5:302021-02-19T13:16:59+5:30
कोपरगाव शहरातून अल्पवीयन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले आहे. तसेच अल्पवयीन मुलीसही तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी जेरबंद
कोपरगाव : शहरातून अल्पवीयन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले आहे. तसेच अल्पवयीन मुलीसही तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
शहरातील एका रोजंदारी करणाऱ्या कुटूंबातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि. १५ फेब्रुवारीला ) रात्री ७ : ३० वाजेच्या सुमारास लघुशंकेस जाऊन येते असे सांगत गायब झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पालकाच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजू पोपट पगारे ( रा. तळवाडे, ता.येवला, जि.नाशिक ) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा केला होता.
दरम्यान, आरोपीस बुधवारी (दि.१७) कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यास २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.