ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:38 IST2021-02-21T04:38:29+5:302021-02-21T04:38:29+5:30
अरुण दादा रोकडे (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर ता. नगर), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १८ सप्टेंबर २०१८ रोजी ...

ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीला कारावास
अरुण दादा रोकडे (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर ता. नगर), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १८ सप्टेंबर २०१८ रोजी नवनागापूर येथे ग्रामसेवक संजय विश्वनाथ मिसाळ हे कार्यालयात काम करीत होते. यावेळी आरोपी रोकडे याने कार्यालयात येऊन मिसाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत मिसाळ यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व समोर आलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मोहन पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना सहायक फौजदार ए. के. भोसले यांनी सहकार्य केले.