पोलिसांवरील हल्ल्यातील आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:58+5:302021-05-17T04:19:58+5:30

या प्रकरणात समावेश असल्याच्या संशयावरून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. शनिवारी ( दि. १५) मध्यरात्रीपासून ते ...

Accused of attacking police arrested | पोलिसांवरील हल्ल्यातील आरोपींना अटक

पोलिसांवरील हल्ल्यातील आरोपींना अटक

या प्रकरणात समावेश असल्याच्या संशयावरून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेत अटक केली आहे.

शनिवारी ( दि. १५) मध्यरात्रीपासून ते रविवारी ( दि. १६) पहाटेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

रिजवान मोहम्मद खान चौधरी ( वय. ३१, रा. अपनानगर संगमनेर),

इर्शाद अब्दुल जमीर (वय. ३७, रा. भारतनगर संगमनेर), सय्यद जोयेबअली शौकत सय्यद( वय. २७, रा. तीनबत्ती चौक, संगमनेर),अर्शद जावेद कुरेशी वय ( १८. रा. लखमीपुरा संगमनेर), मोहम्मद मुस्ताक फारुख कुरेशी( वय ३५. रा. मोगलपुरा, संगमनेर) शफिक इजाज शेख वय ३५, रा. लखमीपुरा संगमनेर), युनूस नूर मोहम्मद शेख (वय ३१ रा. सय्यद बाबा चौक संगमनेर) फारुख बुऱ्हाण शेख( वय ४५, रा. मोगलपुरा, संगमनेर), अरबाज आजीम बेपारी (वय २०, भारतनगर, संगमनेर) अशी अटक केलेल्या नऊ जणांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात १० ते १५ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Accused of attacking police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.