कोकण, कोल्हापूरच्या निकषानुसार पूरग्रस्तांना मदत मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:18+5:302021-09-18T04:22:18+5:30

तिसगाव : शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्यांना कोकण, कोल्हापूरच्या निकषानुसार मदत मिळावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे ...

According to the criteria of Konkan, Kolhapur, flood victims should get help | कोकण, कोल्हापूरच्या निकषानुसार पूरग्रस्तांना मदत मिळावी

कोकण, कोल्हापूरच्या निकषानुसार पूरग्रस्तांना मदत मिळावी

तिसगाव : शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्यांना कोकण, कोल्हापूरच्या निकषानुसार मदत मिळावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुंबई येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ व मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन नुकतीच केली.

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात मनुष्यहानीसह घराची पडझड, पुराचे पाणी घरात शिरून, संसारोपयोगी साहित्य, धान्य, जनावरांचे मृत्यू, पिकांची झालेली हानी, शेतजमिनीचे नुकसान आदींची माहिती राजळे यांनी मुश्रीफ व वडेट्टीवार यांना दिली. अतिवृष्टी व पूरग्रस्तांना अतितातडीची मदत देऊन पंचनामे झालेल्या व नुकसान झालेल्या बाबींची शासकीय निकषानुसार, नुकसान भरपाई न देता, कोकण, कोल्हापूर, सातारा भागासाठी ज्याप्रमाणे विशेष बाब म्हणून अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे, खास बाब म्हणून दोन्ही तालुक्यांतील नुकसानग्रस्तांना व पूरग्रस्तांना भरघोस मदत मिळावी, अशी मागणी राजळे यांनी केली.

याबाबत सविस्तर माहिती व अहवाल घेऊन कोकण, कोल्हापूरच्या धर्तीवर मदत देण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ व वडेट्टीवार यांनी दिले.

---

१७ राजळे

आमदार मोनिका राजळे यांनी मुंबईत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त स्थितीची माहिती दिली.

Web Title: According to the criteria of Konkan, Kolhapur, flood victims should get help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.