शिक्षिकेचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:14 IST2019-04-08T11:13:22+5:302019-04-08T11:14:15+5:30

लोकसभा निवडणुकीचे शेवगाव येथील प्रशिक्षण आटोपून पाथर्डीकडे निघालेल्या शिक्षक दाम्पत्याच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली.

Accidental death of a teacher | शिक्षिकेचा अपघाती मृत्यू

शिक्षिकेचा अपघाती मृत्यू

शेवगाव : लोकसभा निवडणुकीचे शेवगाव येथील प्रशिक्षण आटोपून पाथर्डीकडे निघालेल्या शिक्षक दाम्पत्याच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातातील शिक्षिकेचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान शेवगाव-तिसगाव रस्त्यावर भगूर शिवारात घडली.
मृत महिलेचे नाव भक्ती विनोद गांधी (वय ३२, श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी ) असे आहे. त्यांचे पती विनोद गांधी हे जखमी आहेत. नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातग्रस्त गांधी शिक्षक दाम्पत्य हे लोकसभा निवडणुकीच्या शेवगाव येथील प्रशिक्षणात सहभागी झाले होते. सकाळी ९ ते ५ वेळेतील प्रशिक्षण आटोपून पाथर्डीकडे घरी जात असताना कारच्या जोरदार धडकेने हा अपघात घडला.
अपघातानंतर शेवगाव येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तेथून नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तेथे भक्ती गांधी यांना मृत घोषित करण्यात आले.

Web Title: Accidental death of a teacher