हिवरे झरे येथील युवकाचा अपघाती मृत्यू : अहमदनगर-दौंड महामार्गावरील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:36 IST2019-05-21T18:35:54+5:302019-05-21T18:36:31+5:30
अहमदनगर-दौंड महामार्गावरील हिवरे झरे (ता.नगर) गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली.

हिवरे झरे येथील युवकाचा अपघाती मृत्यू : अहमदनगर-दौंड महामार्गावरील दुर्घटना
केडगाव : अहमदनगर-दौंड महामार्गावरील हिवरे झरे (ता.नगर) गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात संदीप रावसाहेब टकले (वय २७, रा. हिवरे झरे) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.
संदीप रावसाहेब टकले (वय २७, रा. हिवरे झरे)असे अपघातातील मयताचे नाव आहे. तो आपल्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलवरून कोळगावकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यास धडक दिली. या धडकेने तो सुमारे २० ते २५ फूट लांब उडून पडला. गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कार चालक कार तेथेच सोडून नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.