नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:15 IST2019-08-17T11:14:36+5:302019-08-17T11:15:00+5:30

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर हंडीनिमगाव शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला

Accident: Two killed, four injured on Nagar-Aurangabad highway | नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार, चार जखमी

नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार, चार जखमी

नेवासा : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर हंडीनिमगाव शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव शिवारात शनिवारी रात्री तीनच्या सुमारास झाला.
जालना येथून जुन्नर येथे लग्न समारंभासाठी जात असलेल्या स्कॉर्पिओ क्र.(एम.एच.२२ एन.४५६३) च्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माल ट्रॅक क्र.(एम.एच.१२ एल. टी. ९३५९) ला मागील बाजूने जोराची धडक बसली. या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे. त्यानंतर प्रवाश्यांनी स्कॉर्पिओतील जखमींना बाहेर काढून नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये दिनार घुमारे , रॉबिन जेम्स जबर मार लागल्याने मयत झाल. आदेश गायकवाड, रवींद्र आडबोले, सुमित गायकवाड व कल्याण ठोंबरे (सर्व रा.रामनगर जालना) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत सुमित गायकवाड यांच्या फियार्दीवरून स्कॉर्पिओ चालक कल्याण ठोंबरे याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जरे करीत आहे.

Web Title: Accident: Two killed, four injured on Nagar-Aurangabad highway