पळवे शिवारात अपघात; महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्या वडिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 16:09 IST2020-12-19T16:08:13+5:302020-12-19T16:09:34+5:30
पळवे : नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे मठवस्ती येथे पुणे हून नगरकडे भरधाव वेगाने जात असणा-या (क्रेअटा गाडी क्रं. DN 09 K 2913) या गाडीने ह.भ.प महादेव भाऊसाहेब गाडिलकर (वय ८५) यांना जोराची धडक दिल्याने गाडिलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

पळवे शिवारात अपघात; महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्या वडिलांचा मृत्यू
पळवे : नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे मठवस्ती येथे पुणे हून नगरकडे भरधाव वेगाने जात असणा-या (क्रेअटा गाडी क्रं. DN 09 K 2913) या गाडीने ह.भ.प
महादेव भाऊसाहेब गाडिलकर (वय ८५) यांना जोराची धडक दिल्याने गाडिलकर यांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात साडे अकराच्या सुमारास झाला. फिर्यादी रामदास तरटे यांनी गाडी चालक श्रेणीक दोशी यांचे वर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मयत गाडीलकर हे धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असल्याने वारकरी संप्रदाय तसेच पळवे गावावर शोककळा पसरली आहे. ते गोरक्षनाथ महादेव गाडिलकर (उपविभागीय महसूल उपायुक्त नाशिक) यांचे वडील होते. महामार्गावर
मठवस्ती या परिसरात वाहणांना मोठा वेग असतो. याठीकाणी अनेक अपघात झालेले आहेत मोठी वस्ती असल्याने पादचाऱ्यांची आवक जावक सतत असते यामुळे या महामार्गावर वस्तीच्या दोन्ही बाजूंनी गतीरोधक तयार करावेत अशी मागणी रामदास तरटे यांनी केली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार डी. बी शेरकर करत आहेत.