पळवे फाट्यावर अपघात, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:20+5:302021-01-13T04:54:20+5:30

पळवे : नगर-पुणे महामार्गावर पळवे शिवारात भरधाव वेगाच्या बोलेरो जीपने बुलेटला मागून जोराची धडक बसल्याने ...

Accident at Palve fork, six injured | पळवे फाट्यावर अपघात, सहा जखमी

पळवे फाट्यावर अपघात, सहा जखमी

पळवे : नगर-पुणे महामार्गावर पळवे शिवारात भरधाव वेगाच्या बोलेरो जीपने बुलेटला मागून जोराची धडक बसल्याने मोटारसायकलवरील दोनजण, तर बोलेरोमधील चारजण जखमी झाले.

सोमवारी दुपारच्या सुमारास बुलेट मोटारसायकलवरून दोन प्रवासी जात असताना पाठीमागून आलेल्या बोलेरो कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुलेटला जोराची धडक बसली. यात बुलेटवरील दोघेही गाडीसह रस्ताच्या बाजुला जाऊन पडले, तर बोलेरो गाडीही पुढील गाडीला चुकवण्याच्या नादात रोडच्या खाली खोल खड्ड्यात जाऊन आदळली. त्यामुळे बुलेटवरील दोघे, तर बोलेरोतील चार असे सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांनी मदत करून सुपा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. बुलेटवरील प्रवासी कुठले आहेत हे समजू शकले नाही, तर बोलेरोतील प्रवासी पाथर्डी तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Accident at Palve fork, six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.