नगर -पुणे महामार्गावर दोन तरून ट्रकच्या धडकेत जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:50 IST2018-12-08T20:50:05+5:302018-12-08T20:50:52+5:30
अहमदनगर - पुणे हायवेवरील गव्हाणवाडी शिवारात झालेल्या अपघातामध्ये दोन तरूण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.

नगर -पुणे महामार्गावर दोन तरून ट्रकच्या धडकेत जागीच ठार
पळवे : अहमदनगर - पुणे हायवेवरील गव्हाणवाडी शिवारात झालेल्या अपघातामध्ये दोन तरूण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.
निलेश सुखदेव शेलार (वय 28, राळेगण म्हसोबा, ता.नगर) आणि योगेश दिलीप साळूंके (वय 29, केडगाव, ता.नगर) हे दोघे जागीच ठार झाले. नगर - पुणे महामार्गावर गव्हाणवाडी हाॅटेल गुरुकृपा समोर हा अपघात झाला.
राळेगण येथून हे तरून बेकार्ड कंपणी कारेगाव येथे कामासाठी चालले होते. भरधाव वेगात मागून जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यात एक तरुण संदिप धोत्रे (राळेगण ता. नगर) जखमी झाला आहे. अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.