लग्नाच्या आमिषाने अत्याचार, एक मुलगा झाला, दुसऱ्यांदाही गरोदर

By शिवाजी पवार | Updated: September 6, 2023 15:31 IST2023-09-06T15:31:20+5:302023-09-06T15:31:34+5:30

श्रीरामपुरातील प्रकार; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

abused by the lure of marriage had a son and got pregnant a second time | लग्नाच्या आमिषाने अत्याचार, एक मुलगा झाला, दुसऱ्यांदाही गरोदर

लग्नाच्या आमिषाने अत्याचार, एक मुलगा झाला, दुसऱ्यांदाही गरोदर

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्यावर फसवणूक व अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीचे नाव अरबाज एजाज बागवान (वय २३, रा. संजयनगर, श्रीरामपूर) असे आहे. याप्रकरणी १९ ऑगस्टला शहर पोलिस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला होता.    अरबाज बागवान याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्याच्यापासून एक मुलगा झाला. आता पुन्हा त्याच्यापासून सात महिन्याची गरोदर आहे. बागवान याला लग्नाबाबत विचारणा केल्यास तो मारहाण करतो. योग्य वेळ आल्यावर लग्न करीन, असे सांगतो. मात्र बागवान याने शहरातील अन्य एका मुलीशी लग्न केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याने आपली फसवणूक केली आहे, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. संजयनगर येथील त्याच्या राहत्या घरी रात्री बारा वाजेच्या दरम्यान आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.    पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, दादाभाई मगरे, रघुवीर कारखेले, राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमीझराजा अतार, मच्छिंद्र कातकडे, संभाजी खरात यांनी ही कारवाई केली.
 

Web Title: abused by the lure of marriage had a son and got pregnant a second time