फरार वाळूतस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:05 IST2019-04-08T11:05:49+5:302019-04-08T11:05:52+5:30

वाहनचालकांवर प्राणघातक हल्ला करून गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या तिघा वाळूतस्करांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण पिंपरी (ता़ पैठण) येथून अटक केली़

 The absconding gangs are arrested | फरार वाळूतस्करांना अटक

फरार वाळूतस्करांना अटक

अहमदनगर: वाहनचालकांवर प्राणघातक हल्ला करून गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या तिघा वाळूतस्करांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण पिंपरी (ता़ पैठण) येथून अटक केली़
नय्यूम उर्फ नईमखान कासम पठाण, सुभान यासीन शेख, रईस महंमद हानिफ (सर्व रा़ कुरणपिंपरी) असे अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत़ या तिघांनी वाळूचा ठेका न मिळाल्याने पिंगेवाडी (ता़ शेवगाव) येथे विठ्ठल सोपान मुंढे व त्यांच्या सहकाऱ्यांवर हत्यारांनी प्राणघातक हल्ला केला होता़ मुंढे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई झाली होती़ हे आरोपी पिंपरी कुरण परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कॉन्स्टेबल बबन मखरे, दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, संदीप पवार, भागिनाथ पंचमुख, विनोद मासाळकर, सचिन अडबल यांच्या पथकाने आरोपींना अटक केली़

Web Title:  The absconding gangs are arrested