फरार आरोपी दोन वर्षानंतर जेरबंद; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:46 IST2020-05-06T16:46:17+5:302020-05-06T16:46:42+5:30
घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री जेरबंद केले. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे.

फरार आरोपी दोन वर्षानंतर जेरबंद; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार
भंडारदरा : परिसरातील घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री जेरबंद केले. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे.
घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार प्रकरणात भगवान जगनर हा आरोपी मागील दोन वर्षापासून फरार होता. हा आरोपी वांरवार पोलिसांना चकवा देत होता. परंतु राजूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या कर्मचाºयासह सापळा रचून आरोपीस घाटघर येथील त्याच्या राहात्या घरातून सकाळी पाच वाजता ताब्यात घेतले. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.