भर रस्त्यात उभ्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:14 IST2019-03-30T18:14:03+5:302019-03-30T18:14:09+5:30

उन्हाच्या तडाख्यामुळे उभी असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना कोपरगाव शहरातील इंदिरा पथ रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास घडली.

 Abridged car took place in the center of the stomach | भर रस्त्यात उभ्या कारने घेतला पेट

भर रस्त्यात उभ्या कारने घेतला पेट

कोपरगाव : उन्हाच्या तडाख्यामुळे उभी असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना कोपरगाव शहरातील इंदिरा पथ रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास घडली.या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
शहरातील इंदिरा पथ येथील एका हॉस्पिटल मध्ये गंगापूर येथील अनुराग पाटील परिवारासह या कार मध्ये आले होते. सदरची गाडी एलपीजी गॅस वर असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे कारने पेट घेतला कार मधे गॅस सिलेंडर असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.परंतु कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी वेळीच पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Web Title:  Abridged car took place in the center of the stomach