शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांकडून मंडल अधिका-याचे अपहरण; संतप्त वाळू तस्करांकडू पथकाच्या कारची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:15 IST

वाळू तस्करी करणारा ट्रक अरणगाव शिवारात गुरुवारी  (दि.६ फेब्रुवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जामखेड तहसीलदारांच्या पथकाने पकडला. सदर ट्रक  जामखेड तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना वाळू तस्करांनी मंडल अधिका-याचे अपहरण केल्याची घटना घडली. दरम्यान जामखेड पोलिसांनी ट्रकला अडवून मंडल अधिकाºयाची सुटका केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

जामखेड : वाळू तस्करी करणारा ट्रक अरणगाव शिवारात गुरुवारी  (दि.६ फेब्रुवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जामखेड तहसीलदारांच्या पथकाने पकडला. सदर ट्रक  जामखेड तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना वाळू तस्करांनी मंडल अधिका-याचे अपहरण केल्याची घटना घडली. दरम्यान जामखेड पोलिसांनी ट्रकला अडवून मंडल अधिकाºयाची सुटका केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती अशी की, अवैध गौण खनिज वाहतूक करणारा वाळूचा ट्रक शुक्रवारी रात्री महसूलच्या पथकाने पकडला. यावेळी मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे हे ट्रकमध्ये बसून ट्रक तहसील कार्यालयात नेत होते. यावेळी ट्रक ट्रक मालक व चालकाने ट्रक तहसीलमध्ये न नेता तो मंडल अधिकारी यांच्यासह ट्रक पळवून नेला. यावेळी चालक, मालकाने ट्रकमधील वाळू रस्त्यातच खाली केली. यानंतर हा ट्रक गव्हाणे यांना घेऊन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हद्दीत नेण्यात आला. या घटनेची माहिती जामखेडचे पथक प्रमुख तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तातडीने जामखेड व आष्टी पोलिसांना  दिली. पळवलेल्या  ट्रकचा जामखेड पोेलिसांनी पाठलाग करुन आष्टी (जि. बीड) तालुक्यातील हद्दीत पकडला. ट्रकमधून मंडल अधिकारी गव्हाणे यांची सुटका केली. जामखेड पोलिसांनी ट्रक शुक्रवारी पहाटे जप्त करुन जामखेड पोलीस ठाण्यात आणला आहे. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. वाळू तस्कारांनी कार फोडलीदरम्यान शुक्रवारी पहाटे संतप्त झालेल्या वाळू तस्करांनी महसूल पथकातील तलाठी हजारे यांच्या जामखेड येथील घरासमोर उभी असलेली कार फोडली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.  या घटनेप्रकरणी मंडल अधिकारी गव्हाणे यांचे पोलिसांत फिर्याद देण्याचे काम सुरू होते. दरम्यान वाळू तस्कारांच्या दहशतीने जामखेड शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन  सदर घटनेचा महसूल कर्मचा-यांनी निषेध केला आहे. तहसीलदार, कर्जत उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या निवेदनावर कामगार तलाठी सुखदेव कारंडे, एस.के.खिळे, एस. आर. शेख,  ए.पी.जोशी,  जी.जे.नागोरे, आर. जे.गावीत, एस. एस. हजारे यांच्यासह ३२ कर्मचाºयांच्या सह्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडCrime Newsगुन्हेगारीsandवाळू