नगरमधील आडते बाजार, डाळमंडई तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:30 IST2020-06-27T12:30:15+5:302020-06-27T12:30:56+5:30

अहमदनगर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील आडते बाजारातील व्यापाºयांनी स्वत:हुन तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aadte Bazaar in the town, Dalmandai closed for three days | नगरमधील आडते बाजार, डाळमंडई तीन दिवस बंद

नगरमधील आडते बाजार, डाळमंडई तीन दिवस बंद

अहमदनगर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील आडते बाजारातील व्यापाºयांनी स्वत:हुन तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

    रविवार ते मंगळवार (दि. २८ ते ३० जून) अशा तीन दिवस मार्केटयार्ड, आडतेबाजार, दालमंडई, तापकीरगल्ली, दाणेडबरा व परिसरातील व्यापार पेठ बंद ठेवण्यात येणार आहे. 
  
    अहमदनगर आडते बाजार मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, शांतीलाल गांधी, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा आदींनी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
  आडतेबाजार ही जिल्ह्यातील बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत जिल्ह्यातून लोक येतात. आडतेबाजाराच्या आजुबाजूच्या परिसरातील भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवण्याचा स्वत:हून निर्णय घेतला आहे.

Web Title: Aadte Bazaar in the town, Dalmandai closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.