शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आधार साईंचा... 90 वर्षीय पत्रलेखक सुधाकर वखारे शिर्डीच्या साई आश्रयाला

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 3, 2023 15:10 IST

सुधाकर वखारे हे शिक्षकी पेशातील. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम करत

सचिन धर्मापुरीकरकोपरगाव (जि. अहमदनगर) : नातं मनुष्याला आधार देत असते पण जे लोक निराधार आहेत त्यांच्या जीवनात शिर्डीच्या गणेश दळवी यांनी आनंद निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. त्यांच्या साई आश्रयामध्ये कोपरगावचे ९० वर्षीय पत्रलेखक सुधाकर तात्याबा वखारे उर्फ गुरु यांना दिसायला कमी झाल्यामुळे आणि कुणाचाही आधार नसल्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल करून आधार दिला आहे.

सुधाकर वखारे हे शिक्षकी पेशातील. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम करत. समाजाने शिंपी ही त्यांची ओळख. कर्मवीर शंकरराव काळे कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात गोडाऊन विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली होती. विविध वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवण्याचा छंद होता. आकडेमोड करण्यात ते फार तरबेज असायचे. तरुणपणाच्या काळात त्यांनी पडेल ते काम केले. इंग्रजी या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. येवलेचे असतानाही त्यांचा अनंत काळ कोपरगावच्या वास्तव्याला होता.

इंटरनेट मोबाईल येण्याच्या अगोदर कोपरगाव येथील अनेक नामांकित पत्रकारांच्या बातम्या, जाहिरातीची रोख रक्कम, फोटो ब्लॉक, आदी तत्सम काम घेऊन जाण्यात ते सतत पुढाकार घ्यायचे. नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपासून ते थेट मुंबई, नवी दिल्ली पर्यंतच्या संपादकापर्यंतचा, जाहिरात व्यवस्थापकांशी त्यांचा संपर्क असायचा. स्टेट्समन या इंग्रजी दैनिकात त्यांनी केलेल्या लिखाणाला पुरस्कारही मिळालेला आहे. सध्याच्या समाजमाध्यमाच्या काळाच्या अगोदर त्यांनी कित्येक वेळा असंख्य योजनांचे परिपत्रके शहरात, गावागावात, तालुक्यात वाटून अनेक वेळा संबंधित माहितीपत्रके भिंतीवर चिटकवण्याचे देखील काम केलेले आहे. डॉक्टर, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध समाज संघटनांचे अध्यक्ष, चित्रपट पोस्टर बॉय आदि सोबत त्यांची मैत्री होती. त्यामुळे त्यातून मिळणारे काम त्यांच्या चरितार्थाचे साधन होते., यात मिळणाऱ्या पैशात ते समाधान मानत. विविध वर्तमानपत्रातील योजनांमध्ये भाग घेऊन त्यांनी अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. याशिवाय लॉटरी तिकिटे विकूनही त्यांनी आपला चरितार्थ सांभाळला होता.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकारकोपरगावच्या कापड बाजारातील जुन्या पोस्ट जवळ जिन्याखाली नेहमी वास्तव्य असायचे. कुशाग्र बुद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. दाढी वाढलेली, कळकट, मळकट कपडे यामुळे त्यांचा अवतार विचित्र झाला होता. त्यांच्या डोळ्यावर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र वय जास्त झाल्यामुळे त्यांची नजर आणखीन कमजोर झाली, परिणामी त्यांच्या जीवनाची आबाळ होऊ लागली. त्यामुळे शिर्डीच्या साई आश्रयात त्यांची रवानगी मुंबादेवी तरूण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड, राजेंद्र शिंगी, गिरीश झंवर, गोपाळ वैरागळ, दिनेश गवळी व परिसरातील नागरिकांनी केली. त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :shirdiशिर्डीAhmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबा