अहमदनगर: पुणतांबा येथे बिबट्याचा बछडा सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:22 IST2023-06-01T13:22:07+5:302023-06-01T13:22:26+5:30
पुणतांबा -श्रीरामपूर या राज्य मार्ग ४६ आज सकाळी साडे सात आठच्या दरम्यान काही दिवसाचे बिबट्याचा बछडा आढळून आला.

अहमदनगर: पुणतांबा येथे बिबट्याचा बछडा सापडला
मधु ओझा
पुणतांबा (जि. अहमदनगर): येथील इनामदार वस्ती समोरील राज्यमार्ग ४६ वर आज सकाळी आठ वाजता बिबट्याचा नर जातीचा जिवंत बछडा आढळून आला असून वनविभागाला याबाबत कळविण्यात आले आहे.
पुणतांबा -श्रीरामपूर या राज्य मार्ग ४६ आज सकाळी साडे सात आठच्या दरम्यान काही दिवसाचे बिबट्याचा बछडा आढळून आला असून, त्याला रघुविमल पेट्रोल पंपावर वनविभागाचे कर्मचारी अधिकारी येईपर्यंत ठेवण्यात आले आहे. त्या पिलालाची आई तिथेच जवळपास असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. संगमनेर वनविभागाचे कर्मचारी त्या बछड्याला ताब्यात घेण्यास निघाल्याचे सांगितले जात आहे.