१७०० किलो गोमांस घेऊन जाणारे वाहन पकडले, समृद्धी महामर्गावर पोलिसांची कारवाई, २ अटकेत
By सचिन धर्मापुरीकर | Updated: April 28, 2024 13:23 IST2024-04-28T13:22:44+5:302024-04-28T13:23:38+5:30
Ahmednagar: १७०० किलो गोमांसची वाहतुक करणाऱ्या वाहनास पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील शिर्डी टोलनाक्यावर पकडले. याप्रकरणी कुर्ला येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.

१७०० किलो गोमांस घेऊन जाणारे वाहन पकडले, समृद्धी महामर्गावर पोलिसांची कारवाई, २ अटकेत
- सचिन धर्मापुरीकर
अहमदनगर - १७०० किलो गोमांसची वाहतुक करणाऱ्या वाहनास पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील शिर्डी टोलनाक्यावर पकडले. याप्रकरणी कुर्ला येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.
घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री बाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील शिर्डी टोल नाक्यावर एमएच ४३ बीएक्स ८७८५ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास पडले. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी चालकाची विचारपूस केली. तेव्हा चालक व त्याचा साथीदार बिथरल्याचे लक्षात आले. वाहनाची तपासणी केली, असता त्यात गोवंशीय जनावरांचे मांस असल्याचे आढळले. मोहमंद कैफ शरिफ कुरेशी (वय २०, रा. दादामिया उस्मान चाळ, कुर्ला पूर्व मुंबई) व रिजवान मलंग कुरेशी (वय ३६, रा. हाजी करामतअली रोड, कुर्ला पूर्व मुंबई) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोन लाख ७० हजार रूपयांचे १७०० किलो गोमांस व सहा लाख रूपये किमतीचे वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पो.हे.कॉ. दिगंबर जयसींग शेलार यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात वरील दोन जणांविरूद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९७६ चे कलम ५,९,११ व भादंवि कलम १८८, २७९, २७१, ३४ साथ रोग अधिनियम १८९७ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पो.हे.कॉ के. ए. जाधव करीत आहेत.