पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

By अरुण वाघमोडे | Updated: June 14, 2024 16:38 IST2024-06-14T16:37:13+5:302024-06-14T16:38:21+5:30

या घटनेनंतर शुक्रवारी मुलाचे आजोबा सुरेश डहाके, माजी नगरसेवक निखिल वारे व परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

A five-year-old boy was attacked by a stray dog | पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

अहमदनगर: शहरातील तवले नगर येथील शिवशंभो गृहनिर्माण सोसायटीत घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. शिवार्थ शेखर डहाके असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

या घटनेनंतर शुक्रवारी मुलाचे आजोबा सुरेश डहाके, माजी नगरसेवक निखिल वारे व परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी वारे म्हणाले गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नगर शहरात महापालिकेची मोकट कुत्रे पकडणारी यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांचा मानवी वस्ती परिसरात मोठा वावर वाढला असून ते माणसांवर हल्ले करत आहेत.

महापालिका मात्र या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही. भविष्यात अशा काही घटना घडल्या याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे. त्यामुळे मनपाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 

Web Title: A five-year-old boy was attacked by a stray dog