कोपरगावात रहदारीला अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल
By रोहित टेके | Updated: February 28, 2023 08:52 IST2023-02-28T08:52:03+5:302023-02-28T08:52:40+5:30
खूप दिवसांनंतर कोपरगाव शहरातील बेशिस्त वाहनधारकावर पोलिसांनी अशाप्रकारे कारवाई केल्याने या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.

कोपरगावात रहदारीला अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल
कोपरगाव - शहरातील मुख्य रस्त्यावर गांधी चौक, सावरकर चौक परिसरात सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने दुतर्फा वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकावर कोपरगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करीत सोमवारी (दि.२७) रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिंगबर शेलार यांनी जावेद शब्बीर पटेल (वय ३६ रा इंदिरानगर, कोपरगाव ) यांच्याकडील छोटा हात्ती गाडी ( एम. एच.०४ डी.के. ५२४७ ), बबन अर्जुन गायकवाड ( वय २७ रा.रामवाडी,संवत्सर ता.कोपरगाव ) यांच्याकडील दुचाकी ( क्र.एम.एच.०२ ए.सी.५६६१ ), राजेंद्र सोपान भालेराव ( वय ४३, गिरमे वस्ती, रा. इंदिरानगर, कोपरगाव ) यांच्याकडील छोटा हात्ती गाडी ( एम. एच.४१ ए.यु. ०३९७ ), अतुल संतोष माळी ( वय २१ रा. सावळीविहीर ता. राहता ) यांच्याकडील दुचाकी ( एम. एच.१७ सी.एच. २९७९ ) या बेशिस्त वाहनधारकावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान खूप दिवसांनंतर कोपरगाव शहरातील बेशिस्त वाहनधारकावर पोलिसांनी अशाप्रकारे कारवाई केल्याने या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.