ऊसतोड कामगारांचा ५ वर्षांचा मुलगा शेतातील बोअर-वेलमध्ये पडला; अहमदनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 21:50 IST2023-03-13T21:46:42+5:302023-03-13T21:50:01+5:30
घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित तळ ठोकून आहेत.

ऊसतोड कामगारांचा ५ वर्षांचा मुलगा शेतातील बोअर-वेलमध्ये पडला; अहमदनगरमधील घटना
कर्जत (जि. अहमदनगर) : सोमवारी संध्याकाळी कोपर्डी (ता.कर्जत) येथील शेतातील बोअर-वेलमध्ये ऊसतोड कामगारांचा पाच वर्षांचा मुलगा पडला असून त्याला वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित तळ ठोकून आहेत.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, कोपर्डी (ता. कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या गट नंबर १४८ मधील उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा. चिडीयापुरा, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) हा सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास बोअरमध्ये पडला.