महसूलच्या ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: May 31, 2016 23:08 IST2016-05-31T23:02:45+5:302016-05-31T23:08:56+5:30

अहमदनगर : श्रीरामपूर व संगमनेर तहसीलदारांसह लिपिक आणि अव्वल कारकुनांसह ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जारी केले आहेत़

85 Revenue Replacements | महसूलच्या ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

महसूलच्या ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : श्रीरामपूर व संगमनेर तहसीलदारांसह लिपिक आणि अव्वल कारकुनांसह ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जारी केले आहेत़
एका पदावर तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी झाल्या़ तहसीलदार, लिपिक, अव्वल कारकून, चालक आणि शिपाई पदावरील बदल्या केल्या आहेत़ श्रीरामपूरचे तहसीलदार किशोर कदम यांची बदली दौंडीचा येथे तहसीलदार पदी झाली आहे़ त्यांच्या जागी अश्विनकुमार पोतदार आले आहेत़ संगमनेरचे तहसीलदार शरद घोडके यांची बदली नाशिक येथे चिटणीसपदी झाली आहे़ त्यांच्या जागी साहेबराव पोतदार आले आहेत़ विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मंजुषा घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ जामखेडचे नायब तहसीलदार राजेंद्र दराडे यांना नंदूरबार जिल्ह्यातील सरदार सरोवरच्या तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे़ नेवाशाचे रोहिदास वारुळे यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे़
पालिकेच्या ३१ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या
जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, देवळाली प्रवरा, शिर्डी, पाथर्डी, श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी, राहाता आदी नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांच्या प्रथमच जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़ यापूर्वी जिल्हांतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या़ प्रथमच अशा बदल्या झाल्याने हे अधिकारी बदल्यांच्या ठिकाणी हजर होणार की न्यायालयात धाव घेतात, यावरच या बदल्यांचे भवितव्य अवलंबून आहे़
२३ कर्मचाऱ्यांच्या
विनंती बदल्या
जिल्ह्यातील लिपिक १४, अव्वल कारकून ६, चालक १ आणि शिपाई ३ अशा एकूण २३ कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत़
जिल्ह्यातील लिपिक १८, अव्वल कारकून ५१, चालक २ अशा एकूण ७१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत़

Web Title: 85 Revenue Replacements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.