रिक्षासह आठ हजारांचा गांजा जप्त

By Admin | Updated: April 18, 2016 00:36 IST2016-04-18T00:23:56+5:302016-04-18T00:36:45+5:30

अहमदनगर : तालुक्यातील दौंड रोडवरील हिवरेझरे शिवारात एका रिक्षामध्ये घेवून जात असलेला आठ हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून पकडला.

8,000 of Ganja seized along with autos | रिक्षासह आठ हजारांचा गांजा जप्त

रिक्षासह आठ हजारांचा गांजा जप्त

अहमदनगर : तालुक्यातील दौंड रोडवरील हिवरेझरे शिवारात एका रिक्षामध्ये घेवून जात असलेला आठ हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून पकडला. प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक आनंद यांना नगर तालुका हद्दीतून एका रिक्षातून (एम. एच. १७) गांजा घेवून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आनंद यांनी विशेष पथक तयार करून शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता दौंड रस्त्यावर सापळा लावला. त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये दोन किलो सुका, हिरवट रंगाचा आणि उग्र वास येत असलेला गांजा आढळून आला. हा गांजा सात हजार रुपये किमतीचा आहे. पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या चंद्रकांत संपत पवार (वय ५०, रा. वाघुंडे, ता. पारनेर) याला अटक केली. तसेच त्याची ६० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली. दोन्ही मिळून ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच पवार याच्याकडील एक मोबाईल आणि एक सीमकार्डही जप्त केले आहे. पोलीस नाईक गोविंद गोल्हार यांच्या फिर्यादीवरून पवार याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस नाईक गोविंद गोल्हार, पोलीस कॉन्स्टेबल अशोक रोकडे, राजेंद्र शेंडे, राजेंद्र सुद्रिक, आनंद सत्रे, उमेश मोरे, चालक भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 8,000 of Ganja seized along with autos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.