काळे कारखान्यासाठी ७५ टक्के मतदान
By Admin | Updated: March 10, 2016 00:02 IST2016-03-09T23:50:18+5:302016-03-10T00:02:06+5:30
कोळपेवाडी : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या एका गटासाठी बुधवारी मतदान झाले. सभासद शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ७५़४६ टक्के मतदान केले.

काळे कारखान्यासाठी ७५ टक्के मतदान
कोळपेवाडी : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या एका गटासाठी बुधवारी मतदान झाले. सभासद शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ७५़४६ टक्के मतदान केले.
काळे कारखान्याच्या एकूण २१ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे माहेगाव देशमुख या एकाच गटातील तीन जागांसाठी बुधवारी मतदान झाले. एकूण ७ हजार २८४ सभासदांपैकी ५ हजार ४९७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला़ त्यात माहेगाव गटातून सर्वाधिक म्हणजे एक हजार २३४ मतदान झाले़ कोपरगाव गटातून सर्वांत कमी ५३९ मतदान झाले़ मंजूर गटात एक हजार १६६, पोहेगाव गटात ८२५ तर चांदेकसारे गटात ६७६ मतदान झाले़
कारखान्याचे अध्यक्ष माजी आ़ अशोक काळे, युवा नेते आशुुतोष काळे, सूर्यभान कोळपे व स्वाभिमानी विकास आघाडीचे अॅड़ दिलीप लासुरे असे चार उमेदवार या गटात होते़ एका गटासाठी जरी निवडणूक असली तरीही सर्वच सभासदांना मतदानाचा अधिकार असल्याने चुरशीची लढाई होऊन ७५़४६ टक्के मतदान झाले़ मतमोजणी ११ मार्च रोजी होणार आहे.
(वार्ताहर)