चिचोंडी पाटीलमध्ये ७ दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:03+5:302021-05-04T04:10:03+5:30
चिचोंडी पाटील : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चिचोंडी पाटील (ता.नगर) ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना ग्रामसुरक्षा समितीची सोमवारी बैठक ...

चिचोंडी पाटीलमध्ये ७ दिवसांचा जनता कर्फ्यू
चिचोंडी पाटील :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चिचोंडी पाटील (ता.नगर) ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना ग्रामसुरक्षा समितीची सोमवारी बैठक झाली. यामध्ये गावात ७ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ मे रोजीच्या मध्यरात्री १२ पासून ते ११ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हॉस्पिटल व औषधालये वगळून अन्य सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत.
यात प्रामुख्याने वैद्यकीय सेवा, औषधालये पूर्णवेळ सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील. घरपोहोच गॅस वितरणही सुरू राहील. बँका, पतसंस्था, सेवा सोसायटी त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. याशिवाय दूध व दुग्धजन्य पदार्थाची दुकाने सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतच सुरु राहतील. जनता कर्फ्यूच्या कालावधीत किराणा दुकाने, तदनुषंगिक मालाची खरेदी विक्री पूर्णत बंद राहील. भाजीपाला, फळे, चिकन अंडी, मटन व इतर मांसाहारी पदार्थांची खरेदी विक्री पूर्णत बंद, सर्व खासगी अस्थापना पूर्णत बंद राहतील. खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले यांना पूर्णतः मनाई असेल,
असा निर्णय घेण्यात आला.
जनता कर्फ्यूच्या कालावधीत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामस्थांवर व व्यावसायिकांवर ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.