कोपरगावात मंगळवारी आढळले ६७ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:21 IST2021-03-31T04:21:55+5:302021-03-31T04:21:55+5:30
कोपरगाव : शहरासह तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाच्या ६७ बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत ...

कोपरगावात मंगळवारी आढळले ६७ बाधित रुग्ण
कोपरगाव : शहरासह तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाच्या ६७ बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून बाधित रुग्णांची संख्या ५३९ इतकी झाली आहे. मंगळवारी रॅपिड अँटिजेन किट तपासणीत २४, खासगी लॅब अहवालात ३७ तर नगर येथील अहवालात ६ असे एकूण तब्बल ६७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा ५३९ वर गेला आहे. ५६ व्यक्तींच्या घशातील स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे, तर ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत ५२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.