६५ हजार प्रवाशांना संपाचा फटका

By Admin | Updated: December 18, 2015 23:16 IST2015-12-18T23:14:42+5:302015-12-18T23:16:23+5:30

अहमदनगर : एसटी कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदचा शुक्रवारी दुसरा दिवस होता़ दुसऱ्या दिवशी दुपारनंतर संप मागे घेण्यात आला़

65 thousand passengers strike | ६५ हजार प्रवाशांना संपाचा फटका

६५ हजार प्रवाशांना संपाचा फटका

अहमदनगर : एसटी कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदचा शुक्रवारी दुसरा दिवस होता़ दुसऱ्या दिवशी दुपारनंतर संप मागे घेण्यात आला़ पण, एसटीचे चाक सायंकाळपर्यंत फिरले नव्हते़ त्यामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार प्रवाशांना संपाचा फटका बसला़ विशेषत: ग्रामीण भागातील जनजीवन संपामुळे विस्कळीत झाले होते़ दरम्यान, उद्या शनिवारपासून बससेवा पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली़
पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी गुरुवारी बंद पुकारला़ संप दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही सुरूच होता़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले़ काहींवर आगारातच मुक्काम करण्याचीही वेळ ओढावली़ कामगार संघटनांच्या विविध मागण्यांबाबत इंटक संघटनेचे पदाधिकारी व परिवहनमंत्र्यांची शुक्रवारी दुपारी संयुक्त बैठक झाली़ बैठकीत कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते़ पण जोपर्यंत संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्याकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका इंटक संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली़ अखेर ४ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन मिळाल्याची घोषणा छाजेड यांनी केली आणि संप निवळला़ परंतु, सायंकाळपर्यंत
प्रवाशांचा
बसस्थानकातच मुक्काम
संप अचानक सुरू झाला़ विविध बसेसने १०० ते १५० प्रवाशी तारकपूर आगारात आले़ परंतु संप सुरू झाला़ त्यामुळे बहुतांश प्रवासी खासगी वाहनातून निघून गेले़ पण १० ते १२ प्रवासी तारकूपर आगारात अडकले होते, या प्रवाशांना आगारातच मुक्काम करावा लागला असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले़

Web Title: 65 thousand passengers strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.