मुळाच्या कालव्यावर बसणार ६४ नवीन गेट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:22+5:302021-07-02T04:15:22+5:30
नेवासा : मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या गेटमधून होणारी पाण्याची गळती व पाण्याचा अपव्यय थांबून अधिक कार्यक्षमपणे ...

मुळाच्या कालव्यावर बसणार ६४ नवीन गेट्स
नेवासा : मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या गेटमधून होणारी पाण्याची गळती व पाण्याचा अपव्यय थांबून अधिक कार्यक्षमपणे पाण्याचे नियोजन करणे शक्य व्हावे यासाठी उजव्या कालव्यावर पहिल्या टप्प्यात ६४ नवीन गेट्स बसविण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक तिथे दुरुस्ती ही केली जाणार आहे. यासाठी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर राहुरी उपविभागात ९, नेवासा तालुक्यातील घोडेगाव उपविभागात १२, नेवासा उपविभागात १२, चिलेखनवाडी उपविभागात ११ तर अमरापूर उपविभागात २० अशा प्रकारे एकूण ६४ गेट्स बसविण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात उजव्या कालव्यावरील उर्वरित १५० गेट्सची कामे करण्यात येणार असून त्यासाठी अंदाजित १ कोटी ८० लाख रुपये इतका निधी लागणार आहे.