लाखात ६० मातांचा मृत्यू

By Admin | Updated: July 10, 2014 00:36 IST2014-07-09T23:49:19+5:302014-07-10T00:36:38+5:30

सुदाम देशमुख, अहमदनगर नगर जिल्ह्यामध्ये बाळंतपणामध्ये मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण हे एक लाखामध्ये ६० असे आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३५ मातांचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला आहे.

60 mothers in lakhs | लाखात ६० मातांचा मृत्यू

लाखात ६० मातांचा मृत्यू

सुदाम देशमुख, अहमदनगर
नगर जिल्ह्यामध्ये बाळंतपणामध्ये मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण हे एक लाखामध्ये ६० असे आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३५ मातांचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू हे नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात होत असल्याचेही वास्तव समोर आले आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव, खासगी रुग्णालयापर्यंत जाण्यात झालेला उशिर आणि प्रसूतीत्तोर रक्तस्त्राव झाल्याने महिलांचा बाळंतपणात मृत्यू होत आहे. या कारणांमुळे महिलांचे मातृत्त्वच धोक्यात आले आहे.
गरोदर असताना योग्य आहार, व्यायाम व काळजी न घेतल्यामुळे प्रसूतीच्या वेळी महिलांना मृत्यू येण्याची शक्यता असते. अशा मृत्युचे प्रमाण हे एक हजारांमध्ये तीन असे आहे. सिझेरियनची वेळ आली तरच अशा मृत्युचा धोका अधिक असतो. गर्भधारणा झाल्यापासून योग्य नियोजन केले तर असा मृत्यू टाळता येतो.
नॉर्मल आणि सिझेरियन अशा दोन प्रकारच्या प्रसूती मोठ्या प्रमाणावर होतात. खासगी रुग्णालयामध्ये नातेवाईकांना भीती दाखवून सिझेरियनचा सपाटा लावला जातो. शासकीय रुग्णालयांमध्ये मात्र नॉर्मल प्रसूतीवरच भर दिला जातो. प्रसूतीदरम्यान बाळ किंवा मातेला धोका असल्यासच सिझेरियन करावे असा नियम आहे. काही रुग्णालयांमध्ये मात्र हा नियम पायदळी तुडविला जातो. कमी खर्च आणि सुरक्षित प्रसूतीसाठी अनेक महिला शासकीय रुग्णालयांकडे धाव घेतात.
पूर्वीच्या काळी गर्भवती महिला दळण दळणे, पाणी आणणे, घरातील कामे करीत होत्या. त्यामुळे त्यांचा व्यायाम व्हायचा. जीवनपद्धतीमध्ये झालेला बदल, प्रसूतीकाळात रुग्णांची नसलेली सहनशक्ती, व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष आदी कारणांमुळे प्रसूती धोकेदायक बनली आहे.
असा असावा आहार
हिरव्या पालेभाज्या, ऋतुमानानुसार फळे, मोड आलेली कडधान्ये, दूध, तिसऱ्या महिन्यापासून रक्तवाढीच्या गोळ््या (किमान १०० दिवस) घेणे जरुरी आहे. भाज्यांची साले न काढता भाज्या वापराव्यात. स्वयंपाक करताना पोषक घटकांचा नाश होणार नाही,याची काळजी घ्यावी.
नगर जिल्ह्यामध्ये एक लाख महिलांमागे ६० महिलांचा बाळंतपणात मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. मात्र आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ७५ हजार प्रसूतीमागे ३५ महिलांचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला आहे. उत्तरेमध्ये महिलांच्या मृत्युचे प्रमाण सर्वाधिक आहे. रुग्णालयांमध्ये असलेल्या असुविधांची पाहणी करून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. जेणेकरून बाळंतपणामध्ये महिलांचे मृत्युचे प्रमाण कमी होईल. मृत्युच्या कारणांमध्ये आढळलेल्या त्रुटी शोधून त्यावर उपाययोजनाही करण्यात येत आहेत.
-डॉ. पी.डी. गांडाळ,
जिल्हा आरोग्य अधिकारी
अप्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस, वेळेवर औषधे उपलब्ध झाले नसतील, शासकीय रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव, शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण जाईपर्यंत झालेला रक्तस्त्राव, वेळेवर तज्ज्ञ डॉक्टर न मिळणे, गुंतागुंतीचे सीझर, काळजी न घेणे, जंतुसंसर्ग आदी कारणांमुळे महिलांचा बाळंतपणात मृत्यू होतो. अलीकडील काळात बाळंतपणामध्ये महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले आहे.
-डॉ. माधुरी देशमुख
(स्त्रीरोग आणि आयुर्वेदतज्ज्ञ)
सुरक्षित मातृत्वाची सप्तपदी......
पाळणा लांबविणे, थांबविणे
प्रशिक्षितांकडून बाळंतपण
पाच वैद्यकीय तपासण्या
लोहयुक्त गोळ््यांचा वापर
आहार व विश्रांती
धनुर्वात प्रतिबंधक लस
रुग्णालयात नोंदणी

Web Title: 60 mothers in lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.