महापालिकेच्या तिजाेरीत ५८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:48+5:302021-04-02T04:21:48+5:30

अहमदनगर : थकीत करावरील शास्ती माफ केल्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मार्चअखेरीस ५८ कोटी रुपये जमा ...

58 crore in NMC treasury | महापालिकेच्या तिजाेरीत ५८ कोटी

महापालिकेच्या तिजाेरीत ५८ कोटी

अहमदनगर : थकीत करावरील शास्ती माफ केल्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मार्चअखेरीस ५८ कोटी रुपये जमा झाले आहेत. सर्वाधिक ३४ कोटी रुपये नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत जमा झाले असून, शास्ती माफीच्या निर्णयाने महापालिकेला तारले असल्याचे कर वसुलीच्या आकडेवारीरून स्पष्ट झाले आहे.

कोरोनामुळे करासह कर्ज वसुलीवरही परिणाम झाला. मात्र कोरोनाच्या संकट काळातही नागरिकांनी महापालिकेचा कर भरला. महापालिकेने थकीत करावरील ७५ टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये जाहीर केला होता. ही सवलत १५ डिसेंबर पर्यंत होती. या काळात मनपाच्या चारही प्रभाग कार्यालयांत २६ कोटींची वसुली झाली. त्यानंतर डिसेंबरमध्ये ५० टक्के शास्ती माफीचा निर्णय झाला. त्यामुळे डिसेंबरमध्ये ८ कोटींची वसुली झाली. ही सवलत संपु्ष्टात आल्यानंतर मात्र कर वसुलीत घट झाली. शास्ती माफीमुळे महापालिकेची चालूवर्षीची वसुली झाली. महापालिेकेच्या तिजोरीत ५७ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले आहेत.

......

ऑनलाईन ७ कोटी जमा

लॉकडाऊनच्या काळात शहरातील ११ हजार नागरिकांनी ७ कोटींचा कर ऑनलाईन भरला. महापालिकेच्या वसुली विभागाने नव्याने संगणक प्रणाली विकसित केली. त्याचा वापर नागरिकांनी केला असून, यापुढे ऑनलाईन वसुलीवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

....

११० कर्मचाऱ्यांची १६ कोटी वसुली

महापालिकेने कर वसुलीसाठी ११० कर्मचाऱ्यांची वसुली लिपिक म्हणून नेमणूक केली आहे. शास्ती माफीची सवलत असलेल्या नाेव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ३४ कोटी रुपये वसूल झाले. नागरिकांनी रांगेत उभे राहून कर भरला. याशिवाय ७ कोटी रुपये ऑनलाईन जमा झाले. महापालिकेच्या ११० कर्मचाऱ्यांनी दहा वर्षांत १६ कोटी रुपये जमा केले असून, त्यात स्वत:हून कर भरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

.....

प्रभागांची वसुली अशी

सावेडी- १६ कोटी ७० लाख ७३ हजार ४३६

शहर-११ कोटी ५३ लाख ३१ हजार १८०

झेंडीगेट- ७ कोटी ४७ लाख ८ हजार ११७

केडगाव-१५ कोटी ५४ लाख ४१ हजार ३७७

Web Title: 58 crore in NMC treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.