शनिवारी ५७ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:04+5:302021-02-05T06:42:04+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ५७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर ६० जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. ...

शनिवारी ५७ जण बाधित
अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ५७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर ६० जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या ९७६ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. शनिवारी खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६ आणि अँटिजेन चाचणीत ११ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये एकही बाधित आढळला नाही. ५७ बाधितांमध्ये
नगर शहर (१५), जामखेड (२), कोपरगाव (२), नगर ग्रामीण (१६), नेवासा (१), पारनेर (४), पाथर्डी (२), राहाता (४), संगमनेर (६), शेवगाव (१), श्रीरामपूर (१) आणि इतर जिल्हा (१), अकोले (२), अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १०९९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७२ हजार १३९ इतके रुग्ण कोरनाबाधित आहेत. त्यापैकी आतापर्यंत बरे झालेली रुग्णांची संख्या ही ७० हजार ६४ इतकी झाली आहे.