५४ वर्षीय नागरिकाचा चालण्याचा विक्रम, बुक ऑफ इंडियात नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:51 IST2022-02-19T16:51:07+5:302022-02-19T16:51:36+5:30
याबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे दिल्लीचे प्रतिनिधी विश्वदीपराय चौधरी म्हणाले, २०२० मध्ये मुंबईतील अठरा वर्षाच्या युवकाने १९ तासात ८९ किलोमीटर पायी चालण्याचा विक्रम केला होता. आता हा विक्रम जवळेतील ज्ञानदेव पठारे यांनी मोडला.

५४ वर्षीय नागरिकाचा चालण्याचा विक्रम, बुक ऑफ इंडियात नोंद
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानदेव धोंडिबा पठारे (वय ५४) यांनी सलग १९ तास पायी चालत १०२ किलोमीटरचे अंतर पार केले. त्यांच्या या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. जवळे (ता.पारनेर) ते आळेफाटा (ता.जुन्नर) व आळेफाटा ते पुन्हा जवळे असे १०२ किमी अंतर ज्ञानदेव पठारे यांनी पार केले. बुधवारी (दि.१६) दुपारी दोन वाजता जवळे बसस्थानकापासून ते आळेफाटाकडे ते पायी निघाले. आळेफाटा येथे पोहोचल्यानंतर ते पुन्हा जवळे येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता पायी चालत पोहोचले. ते एकूण १९ तासात १०२ किलोमीटर चालले.
याबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे दिल्लीचे प्रतिनिधी विश्वदीपराय चौधरी म्हणाले, २०२० मध्ये मुंबईतील अठरा वर्षाच्या युवकाने १९ तासात ८९ किलोमीटर पायी चालण्याचा विक्रम केला होता. आता हा विक्रम जवळेतील ज्ञानदेव पठारे यांनी मोडला. त्यामुळे त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनीही त्यांची सकाळी गावातून मिरवणूक काढली. यावेळी ज्ञानदेव पठारे यांची कन्या रूपाली पोटघन यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानदेव पठारे यांना स्पर्धेसाठी भरत आबासाहेब भापकर, गणेश महादेव बडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महादू पठारे, अशोक सोमवंशी, नवनाथ रासकर, नवनाथ सालके, बाळासाहेब बरशिले, प्रभू पठारे, रवींद्र इंगळे, संपत सोमवंशी आदींचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, माजी सरपंच सुभाष भाऊसाहेब आढाव, माजी उपसरपंच किसनराव रासकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी बडवे, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक गंगाधर महादू मेहेर, पोलीस पाटील बबनराव सालके, सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे आदी उपस्थित होते.
१७ जवळे
जवळे येथे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने ज्ञानदेव धोंडिबा पठारे त्यांचा सन्मान करण्यात आला.