जिल्ह्यात ५२ टक्के पीककर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:44+5:302021-07-30T04:21:44+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पीककर्जवाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बुधवारी आढावा घेतला. जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक ...

जिल्ह्यात ५२ टक्के पीककर्जवाटप
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पीककर्जवाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बुधवारी आढावा घेतला. जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रकाश शेंडे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका विविध उद्योग आणि व्यवसायांना बसला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी शेतीक्षेत्राने अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले होते. यावेळीही तशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी आवश्यक पतपुरवठा बँकांनी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ३ हजार ७५३ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत केवळ ५२ टक्के एवढीच कर्जवितरणाची टक्केवारी आहे. त्यातही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वाटा मोठा आहे. उर्वरित राष्ट्रीयीकृत बँकांची पीककर्जवाटपाची सरासरी अत्यल्प आहे. अशा सर्व बँकांनी अधिक गतिमानतेने आता पीककर्ज वितरणाची प्रक्रिया राबवावी.
प्रत्येक बँकांना त्यांच्या जिल्ह्यातील शाखा, विस्तार लक्षात घेऊनच पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीककर्जासाठी आलेल्या अर्जावर तत्काळ कार्यवाही करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे.