संगमनेरच्या घोडेकर मळ्यात घरफोडी; ५० हजार रोख, तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीला

By शेखर पानसरे | Updated: May 10, 2023 10:58 IST2023-05-10T10:57:50+5:302023-05-10T10:58:13+5:30

घोडेकर मळा येथे अर्जुन काठे आणि त्यांचे मोठे बंधू सयाजी काठे यांची दोन मजली घरे शेजारी-शेजारी आहेत.

50,000 cash and 3 tolas of gold were stolen from a house in Sangamner Ghodekar farm in Ahmednagar | संगमनेरच्या घोडेकर मळ्यात घरफोडी; ५० हजार रोख, तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीला

संगमनेरच्या घोडेकर मळ्यात घरफोडी; ५० हजार रोख, तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीला

संगमनेर : शहरातील घोडेकर मळा येथे चोरट्यांनी बंद असलेल्या घरात चोरी केली. ५० हजार रुपये रोख, तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. ही घटना बुधवारी ( दि.१०) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास ती घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 

घोडेकर मळा येथे अर्जुन काठे आणि त्यांचे मोठे बंधू सयाजी काठे यांची दोन मजली घरे शेजारी-शेजारी आहेत. चोरट्यांनी सयाजी काठे यांच्या घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली होती. त्यानंतर अर्जुन काठे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पहाटे साडेचार वाजता दुसऱ्या मजल्यावर खोलीत झोपलेले सयाजी काठे हे लोखंडी जिना उतरून खाली आले. भावाच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी आत जावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले, लोखंडी कपाट उघडे होते.

याबाबत कुटुंबातील सदस्यांना त्यांनी माहिती दिली. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये आणि तीन तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशी माहिती अर्जुन काठे यांचे पुतणे गणेश सयाजी काठी यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: 50,000 cash and 3 tolas of gold were stolen from a house in Sangamner Ghodekar farm in Ahmednagar