शेवगावच्या कोविड सेंटरला ५० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:41+5:302021-04-09T04:21:41+5:30
शेवगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरमधील साहित्य खरेदीसाठी बॉम्बे मशिनरीचे संचालक ...

शेवगावच्या कोविड सेंटरला ५० हजारांची मदत
शेवगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरमधील साहित्य खरेदीसाठी बॉम्बे मशिनरीचे संचालक तथा उद्योजक सुधीर सबलोक यांनी पन्नास हजार रुपये मदतीचा धनादेश दिला.
रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात शहरातील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार अर्चना पागिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी आदींच्या उपस्थितीत सबलोक यांनी हा धनादेश सुपुर्द केला. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष भागिनाथ काटे यांच्या पुढाकारातून उद्योजक सबलोक यांनी ही मदत केली. या देणगीतून संगणक, कपाट, फ्रिज व काही खुर्च्या अशा सुविधा कोविड सेंटरला मिळणार आहेत. यावेळी रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, माजी अध्यक्ष डॉ. गणेश चेके, डॉ. पुरुषोत्तम बिहाणी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसन माने यांनी केले. सूत्रसंचालन भागिनाथ काटे यांनी केले. सचिव बाळासाहेब चौधरी यांनी आभार मानले.
---
०८शेवगाव मदत
शेवगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला पन्नास हजारांचा धनादेश सुपुर्द करताना उद्योजक सुधीर सबलोक.