संगमनेरात १३०० किलो गोमांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:24 IST2019-10-07T11:23:18+5:302019-10-07T11:24:44+5:30
गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २ लाख २६ हजार रूपये किंमतीचे १३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास संगमनेर येथील भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात करण्यात आली.

संगमनेरात १३०० किलो गोमांस जप्त
संगमनेर : गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २ लाख २६ हजार रूपये किंमतीचे १३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात करण्यात आली.
आझाद कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही, रा.मदिनानगर, संगमनेर) याच्या विरोधात पोलीस कॉँस्टेबल साईनाथ तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांना भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २ लाख २६ हजार रूपये किंमतीचे १३०० किलो गोमांस जप्त केले. पोलीस आल्याचे पाहून कुरेशी पळून गेला. पोलीस नाईक व्ही. जी. खाडे तपास करीत आहेत.