शेवगाव-पाथर्डीसाठी ५ बंधारे मंजूर
By Admin | Updated: August 29, 2014 23:39 IST2014-08-29T23:34:43+5:302014-08-29T23:39:08+5:30
पाथर्डी : पाथर्डी-शेवगाव मतदारसंघासाठी जलसंधार महामंडळाकडून २ कोटी १६ लाख रुपयांचे पाच बंधारे मंजूर झाले असल्याची माहिती आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिली.

शेवगाव-पाथर्डीसाठी ५ बंधारे मंजूर
पाथर्डी : पाथर्डी-शेवगाव मतदारसंघासाठी जलसंधार महामंडळाकडून २ कोटी १६ लाख रुपयांचे पाच बंधारे मंजूर झाले असल्याची माहिती आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिली.
याविषयी माहिती देतांना आ. घुले म्हणाले, शेवगाव-पाथर्डी दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. माझ्या आमदारकीच्या कालावधीत २१८८ लाख रुपयांचे ६३ बंधारे व ३४ बंधारे साडेसहा कोटी कृषी खात्यामार्फत मंजूर झाले आहेत. या बंधाऱ्यांचे काम प्रगतीपथावर असून काही बंधाऱ्यांचे लोकार्पण झाले आहे. या बंधाऱ्यांमुळे हजारो एकर शेती ओलिताखाली आली आहे. आता जलसंधार महामंडळ,औरंगाबादकडून पाच बंधारे मंजूर झाल्याने या भागातील शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जलसंधार विभागाच्या बंधाऱ्यामुळे शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
आगामी काळात ज्या ठिकाणी बंधाऱ्याच्या साईट आहेत त्या ठिकाणचे सर्वेक्षण झाले असून ते बंधारे मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मतदारसंघाचा विकास करण्यावर माझा भर रहाणार आहे. बंधारे मंजुरीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ,जलसंधारण मंत्री नितीन राऊत, जलसंधारण मंत्री सुरेश धस यांचे सहकार्य लाभले, असे घुले यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)