तळेगाव दिघे येथे शिबिरात ४४ व्यक्तींनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST2021-06-05T04:16:03+5:302021-06-05T04:16:03+5:30
तळेगाव दिघे येथील श्रीराम मंदिरात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतमाता पूजन करून संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या ...

तळेगाव दिघे येथे शिबिरात ४४ व्यक्तींनी केले रक्तदान
तळेगाव दिघे येथील श्रीराम मंदिरात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतमाता पूजन करून संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी उपसरपंच रमेश दिघे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा शारीरिक प्रमुख किरण थोरात, संगमनेर तालुका कार्यवाह विवेक कोथमिरे, तालुका प्रचारक ऋषिकेश जोशी, तळेगाव विद्यालयाचे प्राचार्य एच.आर. दिघे, मेजर सुनील दिघे, राजेंद्र गुंजाळ, शिवसेना नेते पंढरीनाथ इल्हे, दिलीप सोनवणे, राजेश दिघे, संजय कवाडे, शिवाजी दिघे, सचिन कदम, दत्तात्रय दिघे, गणेश बोऱ्हाडे, दत्तात्रय इल्हे, शुभम दिघे, सुमित दिघे, अक्षय दिघे, अतुल कदम, राहुल कदम उपस्थित होते. सदर शिबिरात ४४ व्यक्तींनी रक्तदान केले. यावेळी उपसभापती नवनाथ अरगडे, रमेश दिघे, प्राचार्य एच.आर. दिघे यांनी मनोगत व्यक्त केले.