४२० शिक्षक नियमित

By Admin | Updated: July 2, 2014 00:34 IST2014-07-02T00:34:00+5:302014-07-02T00:34:00+5:30

अहमदनगर : मार्च २०१४ मध्ये राज्य सरकारने निमशिक्षक (वस्तीशाळा शिक्षक) यांना नियमित शिक्षकांचा दर्जा आणि वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला.

420 teachers regular | ४२० शिक्षक नियमित

४२० शिक्षक नियमित

अहमदनगर : मार्च २०१४ मध्ये राज्य सरकारने निमशिक्षक (वस्तीशाळा शिक्षक) यांना नियमित शिक्षकांचा दर्जा आणि वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ४२० निमशिक्षकांना मंगळवारी निमशिक्षकांचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी आता या शिक्षकांनी त्यांच्या वस्ती शाळा आदर्श करण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले.
२००० मध्ये शून्य ते २० पट संख्या असणाऱ्या वस्त्यांवर वस्तीशाळा सुरू करण्यात आल्या. त्यावेळी ठिकाणी अध्यापनासाठी असणाऱ्या शिक्षकांना वस्तीशाळा शिक्षकांचे मानधन देण्यात येत, महिन्याला हजार रुपयांचे मानधन सुरू करण्यात आले. या मानधनात २००४ ला वाढ करण्यात येत ते दीड हजार रुपये करण्यात आले. २००८-०९ ला या शिक्षकांना निमशिक्षकांचा दर्जा देण्यात येऊन मानधन साडेतीन हजार रुपये करण्यात आले आणि आता मार्च २०१४ मध्ये त्यांना नियमित वेतनश्रेणी दर्जा आणि वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
एक हजार रुपये मानधनावर सुरूवात केलेल्या या शिक्षकांना आता २४ हजार रुपये पगार मिळणार आहे. गेली १४ वर्ष या शिक्षकांनी केलेले काम आणि संघटनेच्या माध्यमातून त्यांना त्याचे फळ मिळाले असल्याचे अध्यक्ष लंघे यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या वारीचा कालावधी सुरू असून या शिक्षकांना पांडुरंग पावला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती बाबासाहेब तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, सदस्य संभाजी दहातोंडे आणि प्रवीण घुले उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी बी. वाय. कराड यांनी केले.

तालुकानिहाय नियमित झालेले शिक्षक
राहाता ३, कोपरगाव १९, श्रीरामपूर २०, शेवगाव ४३, कर्जत ५८, पारनेर १५, श्रीगोंदा ११, राहुरी ४९, संगमनेर १९, नगर १३, पाथर्डी २०, जामखेड २९, नेवासा १४, अकोले १०७ यांचा समावेश आहे. यात ३५३ प्रशिक्षित तर ६७ अप्रशिक्षित शिक्षक आहेत.
वस्तीशाळा शिक्षक संघाचे यश
गत बारा वर्षापासून राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ याप्रश्नी लढा देत होते. एक हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांची सेवा सार्थ ठरली आहे. भविष्यात हे शिक्षक चांगले काम करतील अशी अपेक्षा राज्य प्राथमिक संघाचे उपाध्यक्ष दिनेश खोसे यांनी व्यक्त केली.
शिक्षकांचा पाडुरंग!
गेली अनेक वर्ष वस्तीशाळा शिक्षकांनी अल्प मोबदल्यात केलेल्या कामावर त्यांना शासनाने न्याय दिला आहे. सध्या वारकऱ्यांचा ओढा पंढरपूरकडे असून दिंड्या निघाल्या आहे. या काळात त्यांना लंघे यांच्या हस्ते नियमित वेतनश्रेणी आॅर्डर मिळत असून या शिक्षकांसाठी हे पांडुरंग असल्याचे सदस्य संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.

Web Title: 420 teachers regular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.