अहमदनगर, अमरावती, नांदेड अल्पसंख्याकबहुल क्षेत्राच्या विकासासाठी ४० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 17:50 IST2017-08-18T17:50:17+5:302017-08-18T17:50:17+5:30
राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाद्वारे अनुदान वितरणास मंजुरी मिळाली असून अहमदनगर, अमरावती, नांदेड या तीन जिल्ह्यंना मूलभूत विकासाकरिता

अहमदनगर, अमरावती, नांदेड अल्पसंख्याकबहुल क्षेत्राच्या विकासासाठी ४० लाख
अमरावती, दि. 18 - राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाद्वारे अनुदान वितरणास मंजुरी मिळाली असून अहमदनगर, अमरावती, नांदेड या तीन जिल्ह्यंना मूलभूत विकासाकरिता प्रत्येकी ४० लक्ष रूपयांचा निधी देण्यात येईल. अवर सचिव अशोक गायकवाड यांनी यासंदर्भातील आदेश जारी केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या निधीतून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथे मुस्लिम शादीखान्याच्या निर्मितीसाठी १० लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला असून विविध कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामपंचायतीत मुस्लिम समाजासाठी सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष, नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील देवापूर येथे सिमेंट-काँक्रिट रस्त्यासाठी १० लक्ष, नांदेड जिल्ह्यतीलच भुतनहिप्परगा येथील रस्त्यासाठी १० लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहेत.