आश्वी पंचक्रोशीत आढळले ४० कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:20 IST2021-04-17T04:20:25+5:302021-04-17T04:20:25+5:30
आश्वी : संगमनेर तालुक्यात गुरुवारी (दि. १५ एप्रिल) रोजी २७६, तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ...

आश्वी पंचक्रोशीत आढळले ४० कोरोनाबाधित रुग्ण
आश्वी : संगमनेर तालुक्यात गुरुवारी (दि. १५ एप्रिल) रोजी २७६, तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी संगमनेरच्या शहरी भागात ५४, संगमनेर खुर्द येथे ९, आश्वी बुद्रुक येथे ४, आश्वी खुर्द येथे ३, निमगावजाळी येथे ५, चिंचपूर येथे ३, प्रतापपूर येथे ४, शेडगाव येथे १, कनोली येथे १, शिबलापूर येथे १, दाढ खुर्द येथे २, पिंप्री-लौकी अजमपूर येथे ४, कणकापूर येथे १, मनोली येथे १, कोल्हेवाडी येथे ४, औरंगपूर येथे ३, रहीमपूर येथे १, मांची येथे २ रुग्ण आढळले. आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये गुरुवारी ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, नागरिकांनी शासकीय नियम, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना तोंडावर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
............
चौकशी करून कारवाई करावी
श्रीरामपूर : शहरातील कोविड सेंटर येथे रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. या सेंटरची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष लकी सेठी यांनी केली आहे. शहरात शासनाने नेमून दिलेल्या दवाखान्यात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. काळ्या बाजारात २० हजारांपेक्षाही जास्त किमतीत विकले जात आहे. बाजारामध्ये मुळातच नातेवाईक, मित्र कोविडच्या भीतिपोटी रुग्णास भेटत नाही. इंजेक्शनची उपलब्धता रुग्ण करू शकत नाही. त्यामुळे त्यास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. इंजेक्शन नाही म्हणणाऱ्या कोविड सेंटरची चौकशी व्हावी, अशी मागणी लकी सेठी यांनी केली आहे.