शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यतिथी उत्सवात सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 19:48 IST

शिर्डी : साई समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावरील ९९ व्या पुण्यतिथी उत्सवात भाविकांनी सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान दिले. गेल्या ...

शिर्डी : साई समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावरील ९९ व्या पुण्यतिथी उत्सवात भाविकांनी सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान दिले.गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात एक कोटींनी वाढ झाल्याचे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते समाधी शताब्दीचा श्रीगणेशा झाला. उत्सवकाळातील दानपेटीची मोजदाद करण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपकार्यकारी डॉ. संदीप आहेर, मुख्य लेखा शाखा अधिकारी घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.दक्षिणा पेटीत २ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये, देणगी कक्षातून १ कोटी १० लाख ४९ हजार रुपये, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून ३५ लाख ३८ हजार, तर आॅनलाइनच्या माध्यमातून सुमारे २५ लाख ७६ हजारांचे, तर धनादेशांद्वारे सुमारे २९ लाख ३९ हजार असे एकूण ४ कोटी ५३ लाख ६५ हजारांचे दान मिळाले. दक्षिणापेटी व देणगी काउंटरच्या माध्यमातून सोन्याच्या रूपाने ४८० ग्रॅम वजनाचे १२ लाख रुपयांचे सोने, तर २ लाख ८० हजारांची ९ किलो ३५२ ग्रॅम चांदी, तसेच परकीय चलनाच्या माध्यमातून देखील सार्इंच्या झोळीत दान मिळाले आहे. यामध्ये एकूण सोळा देशांचे दान जमा झाले. त्या माध्यमातून ३ लाख ३६ हजारांचे दान साई संस्थानास मिळाले. यात अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, कॅनडा आदी देशांचे चलन आहे. सशुल्क दर्शनाचे सुमारे ३२ हजार पास जनसंपर्क कार्यालयाकडून वितरित करण्यात आले असून, त्याद्वारे ६८ लाख रुपये मिळाले. या उत्सवासाठी चार दिवसांत सुमारे ३ लाख २५ हजार भाविकांनी हजेरी लावल्याचे अग्रवाल म्हणाल्या.