पुण्यतिथी उत्सवात सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 19:48 IST2017-10-03T19:47:32+5:302017-10-03T19:48:02+5:30

शिर्डी : साई समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावरील ९९ व्या पुण्यतिथी उत्सवात भाविकांनी सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान दिले. गेल्या ...

4 crore 71 lakh donations to the saree for the death anniversary | पुण्यतिथी उत्सवात सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान

पुण्यतिथी उत्सवात सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान

शिर्डी : साई समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावरील ९९ व्या पुण्यतिथी उत्सवात भाविकांनी सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान दिले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात एक कोटींनी वाढ झाल्याचे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते समाधी शताब्दीचा श्रीगणेशा झाला. उत्सवकाळातील दानपेटीची मोजदाद करण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपकार्यकारी डॉ. संदीप आहेर, मुख्य लेखा शाखा अधिकारी घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दक्षिणा पेटीत २ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये, देणगी कक्षातून १ कोटी १० लाख ४९ हजार रुपये, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून ३५ लाख ३८ हजार, तर आॅनलाइनच्या माध्यमातून सुमारे २५ लाख ७६ हजारांचे, तर धनादेशांद्वारे सुमारे २९ लाख ३९ हजार असे एकूण ४ कोटी ५३ लाख ६५ हजारांचे दान मिळाले. दक्षिणापेटी व देणगी काउंटरच्या माध्यमातून सोन्याच्या रूपाने ४८० ग्रॅम वजनाचे १२ लाख रुपयांचे सोने, तर २ लाख ८० हजारांची ९ किलो ३५२ ग्रॅम चांदी, तसेच परकीय चलनाच्या माध्यमातून देखील सार्इंच्या झोळीत दान मिळाले आहे. यामध्ये एकूण सोळा देशांचे दान जमा झाले. त्या माध्यमातून ३ लाख ३६ हजारांचे दान साई संस्थानास मिळाले. यात अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, कॅनडा आदी देशांचे चलन आहे. सशुल्क दर्शनाचे सुमारे ३२ हजार पास जनसंपर्क कार्यालयाकडून वितरित करण्यात आले असून, त्याद्वारे ६८ लाख रुपये मिळाले. या उत्सवासाठी चार दिवसांत सुमारे ३ लाख २५ हजार भाविकांनी हजेरी लावल्याचे अग्रवाल म्हणाल्या.

Web Title: 4 crore 71 lakh donations to the saree for the death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.