दहिगावने आरोग्य केंद्रात ३७ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:52+5:302021-08-12T04:25:52+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने, शहरटाकळी, रांजणी आदी भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण होते. रुग्णसंख्या घटताच ...

37 corona affected at Dahigaon health center | दहिगावने आरोग्य केंद्रात ३७ कोरोना बाधित

दहिगावने आरोग्य केंद्रात ३७ कोरोना बाधित

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने, शहरटाकळी, रांजणी आदी भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण होते. रुग्णसंख्या घटताच नागरिकांत बेफिकिरपणा वाढला. त्यामुळे परिसरात कोरोना बाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली असून दोन दिवसांत प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगावने येथे तपासणी केलेल्यांपैकी ३७ नागरिक कोरोना बाधित आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली.

सोमवारी व मंगळवारी दहिगावने ५, रांजणी ९, शहरटाकळी २०, भावीनिमगाव २ आणि खामगाव १ असे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गावातील दवाखाने, मेडिकल, दूध संकलन अशा अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी केले आहे.

................

सर्व कोरोना बाधितांना कोविड केअर सेंटरला उपचार घेणे बंधनकारक आहे. तसेच १५ पेक्षा जास्त रुग्णसंख्या असल्याने शहरटाकळीत पुढील १० दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन राहील. नागरिकांनी सूचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

-अर्चना पागिरे, तहसीलदार शेवगाव

Web Title: 37 corona affected at Dahigaon health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.