बरे झाल्याने ३६ रुग्णांना घरी सोडले, ७५ वर्षांच्या आजीबाई, सहा वर्षाच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:40 IST2020-07-07T12:38:44+5:302020-07-07T12:40:36+5:30

अहमदनगर : ७५ वर्षांच्या आजीबाई आणि सहा वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या आजारातून बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 

36 patients left home after recovery, 75-year-old grandmother, six-year-old Chimukli overcomes corona | बरे झाल्याने ३६ रुग्णांना घरी सोडले, ७५ वर्षांच्या आजीबाई, सहा वर्षाच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात

बरे झाल्याने ३६ रुग्णांना घरी सोडले, ७५ वर्षांच्या आजीबाई, सहा वर्षाच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात

अहमदनगर : ७५ वर्षांच्या आजीबाई आणि सहा वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या आजारातून बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 

एकूण ३६ रुग्णांमध्ये अहमदनगर शहरातील १७, राहाता तालुक्यातील पाच, नगर तालुक्यातील पाच, पारनेर, जामखेड, आणि अकोले येथील प्रत्येकी दोन, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण यांचा समावेश आहे. आज ३६ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने जिल्ह्यात बºया झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५५ इतकी झाली आहे. तर सध्या १८३ रुग्ण उपचार घेत आहेत.

७५ वर्षांच्या आजीबाई या नगर शहरातील पद्मा नगर भागातील तर ०६ वर्षांची मुलगी ही तोफखाना भागातील आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी ही माहिती दिली. 

Web Title: 36 patients left home after recovery, 75-year-old grandmother, six-year-old Chimukli overcomes corona