कोविड सेंटरमधील ३२ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST2021-05-17T04:18:52+5:302021-05-17T04:18:52+5:30
परिसरातील पोहेगांव, चांदेकसारे, घारी, सोनेवाडी, देर्डे चांदवड, देर्डे-कोऱ्हाळे, शहापूर, मढी बुद्रुूक, मढी खुर्द आदी गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या ...

कोविड सेंटरमधील ३२ रुग्णांची कोरोनावर मात
परिसरातील पोहेगांव, चांदेकसारे, घारी, सोनेवाडी, देर्डे चांदवड, देर्डे-कोऱ्हाळे, शहापूर, मढी बुद्रुूक, मढी खुर्द आदी गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. डॉ. सुनील मेहेत्रे, डॉ. जगदीश झंवर, डॉ. नितीन गवळी, डॉ. उषा गवळी, डॉ. आनंद काळे, डॉ. घनश्याम गोडगे, डॉ. नरेंद्र होन, डॉ. रावसाहेब जावळे आदी डॉक्टर रुग्णांना धीर देत विनामोबदला उपचार करतात. रुग्णांना वेळेत औषधोपचार चहा नाष्टा व जेवण व मनोरंजनासाठी दूरदर्शन संचही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. स्वयंस्फूर्तीने सेवाभावी काम करण्यासाठी पोहेगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी योगेश औताडे, सतीश आनाप, परसराम दोडके, ज्ञानेश्वर गायकवाड, सतीश बाम्हणे, ज्ञानेश्वर शेजवळ, अशोक भडांगे, दिलीप भालेराव, रामदास शेजवळ तत्पर असतात. रुग्णांना काय हवे काय नको बारकाईने पाहतात. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे नितीनराव औताडे यांनी कौतुक केले आहे.