एमबीएच्या ३२ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:36+5:302021-01-08T05:04:36+5:30
कोपरगाव : संजीवनी एमबीए अंतिम वर्षाच्या ३२ विद्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विद्यार्थी व ...

एमबीएच्या ३२ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या
कोपरगाव : संजीवनी एमबीए अंतिम वर्षाच्या ३२ विद्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विद्यार्थी व पालकांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास संजीवनीने सार्थ ठरविला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हे म्हणाले, संजीवनी एमबीए विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने टीसीएस, बर्जर पेंट, इटामॅक्स, ओम लाॅजिस्टिक्स, स्ट्रेट स्ट्रीट एचसीएल, ॲटोस सिन्टेल, एक्सा बिझिनेस या कंपन्यांमध्ये ३२ विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देऊन स्वावलंबी बनविले. यातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून, यात टीसीएस कंपनीने अनिकेत रावसाहेब आहेर व ऋषिकेश बाळासाहेब गायकवाड यांना सुरुवातीस वार्षिक ५ लाख ७९ हजार इतके पॅकेज देऊ केले आहे, तर बर्जर कंपनीने शुभम विश्वनाथ बोरखडे यास वार्षिक पॅकेज ५ लाख ७५ हजार दिले आहे. इतरही सर्व विद्यार्थ्यांना चांगले पॅकेज मिळाले आहे. तसेच राज्यातील बहुतांश व्यवस्थापन महाविद्यालयांचे व्यवस्थापनशास्त्र कोलमडले असताना संजीवनी एमबीए विभागाने उद्योग जगताला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ लागते हे हेरले. केवळ पुस्तकी शिक्षण दिल्याने उद्योग जगताच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत हे जाणले. तशा पद्धतीने शिक्षण व प्रशिक्षण पद्धती राबविली. एवढ्या मोठ्या संख्येने विध्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी एमबीए विभागांतर्गत प्राचार्य, एमबीए विभागप्रमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे कोल्हे यांनी सांगितले.